पुणे - माहिती तंत्रज्ञान किंवा बीपीओ क्षेत्रातील महिलांना लक्ष्य करून, त्यांना लुटून, त्यांचा खून करण्याच्या नयना पुजारी प्रकरणासारख्या, गेल्या दीड वर्षात चार घटना घडल्या आहेत. दीड वर्षापूर्वी ज्योती चौधरी, त्यानंतर विद्या घोरपडे, उर्वशी ढवळे व आता नयना पुजारी यांच्याबाबतीत ही दुर्दैवी घटना घडली आहे. या कमावत्या महिलांना लुटल्यानंतर तीन घटनांत त्यांच्यावर अत्याचार झाले होते. पुण्यासारख्या शहरात अशा प्रकारचे गुन्हे घडू लागल्यामुळे पोलिसांनी एक वर्षापासून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या व बीपीओमध्ये दर महिन्याला बैठका घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यात महिलांनी कंपनीच्या बस अथवा मोटारीतून जाताना- येताना काय व कशी दक्षता घ्यावी, याबद्दल त्यांना सांगितले जाते; तसेच सार्वजनिक ठिकाणी वर्तन कसे असावे, इतरांशी बोलताना काय काळजी घ्यावी, वाहनांचे क्रमांक, चालक व त्याची माहिती याबाबतही त्यांना गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांच्याकडून माहिती दिली जाते, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त संग्रामसिंह निषाणदार यांनी दिली. अनेक कंपन्यांनी याबाबत मार्गदर्शनपर पत्रके तयार केली असून त्यांचे वाटपही केले आहे. मात्र, काही कंपन्या पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. त्यांनाही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी आता आग्रह करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
सर्व खबरदारी घेतली जाते तरी गुन्हा हा पुण्या सारख्या शहरा मद्धे होतो याला कोण जिम्मेदार.असे राष्ट्रीय मानवाधिकार संघटना (भारत) चे पुणे ज्हिला सरचिटनिश संजय भाऊ शाह यानी विचारले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment